नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

New News

जॉब्स मराठी पाहणाऱ्या दर्शकांची संख्या झपाट्याने वाढत आहे...
दर्शकांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आम्ही लवकरच नव्या सुविधा पुरविणार आहोत.
आपणाकडील उपलब्ध होणाऱ्या जाहिराती, घडामोडी, निकाल, प्रवेशपत्र, अभ्यासक्रम आणि इतरत्र लिंक्सबद्दल
नव-नवीन माहिती आमच्याकडे jobsmarathi@gmail.com वर पाठवल्यास त्यास आपल्या नावासह त्वरित प्रसिद्ध करण्याचा आमचा प्रयत्न असेल..... तर चला मग पाठवा लवकर..................
------------------------------------------------------
डिसेंबर परीक्षा वेळापत्रक (रविवार)
1 डिसेंबर - राज्यसेवा मुख्य रेल्वे परीक्षा
8 डिसेंबर- सहाय्यक धर्मदाय परीक्षा
15 डिसेंबर- सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक परीक्षाटेट
22 डिसेंबर- विक्रीकर निरीक्षक पूर्वपरीक्षा, सेट परीक्षा
27 डिसेंबर- नेट परीक्षा
5 जानेवारी- उपशिक्षणाधिकारी गट ब चाळणी परीक्षा
----------------------------------------------------------
इंडिया पोस्ट (भारतीय डाक विभाग) मध्ये1,349 जागा रिक्त;
जानेवारीपर्यंत होणार भरती...
पुणे - राज्यातील पोस्ट कार्यालयांत रिक्त असणार्‍या 1,349 जागा जानेवारी 2014 पर्यंत भरल्या जाणार आहेत. महाराष्ट्र व गोवा सर्कलमध्ये पोस्टल असिस्टंटच्या 193, पोस्टमनच्या 665 व मल्टिटास्किंग स्टाफ (ग्रुप डी)च्या 471 जागा रिक्त असल्याचे मुख्य पोस्टमास्टर कर्नल के. सी. मिश्रा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
अधिक माहिती -नोकरी मार्गदर्शन या वेबसाईट वर उपलब्ध आहे.
---------------------------------------------------------
सैन्यभरती मेळावा वेळापत्रक २०१३-१४
कवठेमहांकाळ, कोल्हापूर - ४ ते ११ जानेवारी २०१४
श्री गुरुगोविंदसिंग स्टेडियम, नांदेड - 19 ते 28 नोव्हेंबर २०१३
जिल्हा क्रीडा संकुल, अमरावती - ६ ते १३ नोव्हेंबर २०१३
---------------------------------------------------------
टीईटीच्या माध्यमातून सरकारने 30 कोटी लाटले
        टीईटीच्या माध्यमातून सरकारने बेरोजगार शिक्षक परीक्षार्थींची लूट करून तीस कोटी लाटले, असा आरोप शिक्षणशास्त्र पदविका व पदवीधारक कृती समितीने केला आहे. जगदीश धुळूबुळू, ऍड. अमित शिंदे, प्रवीण पाटील, गोपीचंद व्हनकडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज निवासी जिल्हाधिकारी उत्तम पाटील यांची भेट घेऊन शासनाने परीक्षेचा खर्च जाहीर करावा, अशी मागणी केली. राज्यपालांनाही निवेदन दिले आहे.
निवेदनातील आशय असा ः राज्यभरातील चार लाख बेरोजगारांनी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. प्रत्येकी अडीचशे ते पाचशे रुपये शुल्क आकारले आहे. परीक्षेसाठी मात्र आस्थापना खर्च पाच कोटी रुपये अपेक्षित आहे. तसे असेल तर जादाचे पैसे कशासाठी, याचा खुलासा सरकारने केला पाहिजे. आधीच बेरोजगार असलेल्यांची ही लूटच आहे. हा अन्याय असून जादाचे शुल्क सरकारने परत द्यावे.
निवेदनावर अनिल सुतार, दत्ता मागाडे, अमरिश धुमाळ, प्रवीण सरोदे, प्रशांत पाटील, साकेत थोरात, चैतन्य शिंदे, रमेश आनंदे, अण्णासाहेब चव्हाण यांच्या स्वाक्षरी आहेत.
---------------------------------------------------------
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) साठी ५ लाख उमेदवार
राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) साठी राज्यातून ६ लाख २६ हजार ८२ उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरले असून सुमारे ५ लाख २५ हजार उमेदवारांच्या अर्जाच्या हार्ड कॉपी जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १५ डिसेंबर रोजी ५ लाख उमेदवारच परीक्षा देण्याची शक्यता आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेल्या अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्याची शनिवार १६ नोव्हेंबर २०१३ हि शेवटची मुदत होती. गुरुवार पर्यंत ४ लाख ८० हजार उमेदवारांनी अर्जाच्या हार्ड कॉप्या जमा केल्या आहेत.
सर्व उमेदवारांना २६ नोव्हेंबर २०१३ पासून परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) ऑनलाईन उपलब्ध करून दिले जाईल
असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त दिलीप सहस्रबुद्धे यांनी जाहीर केले.
---------------------------------------------------------
अभियोग संचालनालय, मुंबई लेखी परीक्षा रद्द
अभियोग संचालनालय, मुंबई यांच्या भरतीसाठी निम्न श्रेणी लघुलेखक (इंग्रजी), लिपिक-टंकलेखक, व शिपाई पदासाठी लेखी परीक्षा ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती या परीक्षा केंद्रावर २७ नोव्हेंबर २०१३ रोजी घेण्यात येणार होत्या मात्र काही तांत्रिक कारणामुळे या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
---------------------------------------------------------
नोकरीच्या आमिषाने सांगलीत कोटय़वधींचा गंडा
भारिप जिल्हाध्यक्ष फरार, मुलाला अटक
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे निकटवर्तीय व पक्षाचा नगरचा जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कापसे याच्यासह सात जणांच्या टोळीने सांगली भागातील बेरोजगार तरुणांना रेल्वेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून चार कोटींपेक्षा अधिक रकमेला गंडा घातल्याचे उघड झाले आहे. राहाता पंचायत समितीचा सदस्य असलेला कापसे याचा मुलगा विकी याला पोलिसांनी अटक केली असून, त्याला सात दिवसांची कोठडी देण्यात आली आहे.
मुख्य सूत्रधार राजाभाऊ कापसे फरार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे. कापसे याने विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविली होती. शिवसेना, भाजप व रिपब्लिकन पक्षाच्या युतीकडून तो उत्सुक होता. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या तासगाव मतदारसंघात जाऊन कापसे याच्या टोळीने सुमारे एक कोटीचा, तर पलुस व कुंडल भागांत सुमारे तीन कोटीचा गंडा घातला असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक रमेश बनकर, पोलीस उपनिरीक्षक अविनाश नडविणेकरे तपास करीत आहेत.
कापसे टोळी दीड वर्षांपासून सांगली भागात बेरोजगार तरुणांना गंडा घालण्याचे काम करत आहे. गळय़ात सोन्याचे साखळदंड, बोटांत सोन्याच्या अंगठय़ा, खादीचे कडक कपडे अशा वेशात, महागडय़ा मोटारी तसेच सांगली भागातीलच काही दलालांचा लवाजमा घेऊन कापसे फिरत असे. आठवले यांच्यापासून ते अनेक मंत्री, नेते, अधिकारी यांच्याशी जवळीक असल्याचा बहाणा त्यांच्याकडून केला जात असे. रिपब्लिकन पक्षाचा नगरचा जिल्हाध्यक्ष असल्याने; तसेच आठवले यांचा निकटवर्तीय असल्याने तरुणांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. तासगाव भागात सुमारे ७० ते ८० तरुणांना रेल्वेत तिकीट तपासनीस, शिपाई, कारकून अशा पदांवर नोकरी देण्याचे आमिष त्याने दाखविले. तरुणांकडून ७५ हजार ते ३ लाख रुपयांपर्यंत पैसे त्याने घेतले. पलुस व कुंडल भागांतही शेकडो तरुणांना याचप्रकारे गंडा घातला.
पैसे घेतल्यानंतर या तरुणांना रेल्वेतील नेमणुकीच्या प्रशिक्षणाची खोटी पत्रे देण्यात आली. ठाणे व मध्य प्रदेशात नेऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. तीन ते चार दिवसांच्या प्रशिक्षणानंतर या तरुणांना रेल्वेस्थानके फिरवून आणण्यात आली. आता सहा महिन्यांत नेमणूक होईल, असे सांगण्यात आले. नोकरी न मिळाल्याने तरुणांनी पैशाची मागणी केली. अखेर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली. पलुस व कुंडल येथे फसवणुकीचे गुन्हे नोंदविण्यात आले होते, पण कापसे याने अटकपूर्व जामीनअर्ज केल्याने त्यास अटक झाली नव्हती. काल तासगाव पोलीस ठाण्यात सचिन परशुराम मगदूम याने फिर्याद नोंदविली. त्यानुसार कापसे, त्याचा मुलगा विकी, अशोक सुबराव मतकरी (पलुस), चंद्रशेखर आकाराम सावंत (आटपाडी), कैलास उमाजी अवघडे (ठाणे) या पाच जणांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
उपनिरीक्षक नडविणेकरे यांचे पथक श्रीरामपूर शहरात बुधवारी आले. वाकडी येथे जाऊन त्यांनी विकी कापसे याला अटक केली.

आठवलेंकडे तक्रारी..
फसवणुकीचे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर कापसे याचे धाबे दणाणले होते. फसवणूक झालेल्या तरुणांनी पैशाची मागणी केल्यानंतर सुमारे सव्वा कोटी रुपये परत करण्यात आले होते. पण, उर्वरित रक्कम परत करता न आल्याने अखेर पोलीस ठाण्यापर्यंत हे प्रकरण गेले.
---------------------------------------------------------
महाराष्ट्र राज्यात ६१००० पोलिसांची भरती होणार... 
कऱ्हाड - राज्यात 61 हजार पोलिस कर्मचाऱ्यांच्या पदनिर्मितीच्या गृह विभागाच्या प्रस्तावाला शासनाने नेमलेल्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीची मान्यता मिळाली आहे. लवकरच तो प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी ठेवला जाईल. त्यानंतर पोलिस भरतीला प्रारंभ होईल, अशी माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, राज्यात 61 हजारहून अधिक पोलिसांची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अधिक माहिती -नोकरी मार्गदर्शन या वेबसाईट वर उपलब्ध आहे.
---------------------------------------------------------
शासकीय तंत्रनिकेतनमधील एक हजार रिक्त पदे त्वरित भरणार
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील रिक्त पदांमुळे मोठय़ा समस्या निर्माण झाल्याने शासनाने १ हजार पदे तातडीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. ८५० पदांची भरती मोहीम सुरू झाली असून रिक्त प्राचार्य पदेही भरली जाणार आहेत. प्राध्यापकांची भरती राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातूनच केली जाणार आहे, असे मत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. राज्य शासनाने अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या मान्यतेसाठी बृहत् आराखडा तयार केला असल्याची माहिती देऊन टोपे म्हणाले, हा आराखडा एआयसीटीकडे पाठविला आहे. त्यांना राज्यामध्ये अभियांत्रिकीची नवी महाविद्यालये, तुकडय़ा, अभ्यासक्रम त्यांना मान्यता देण्यापूर्वी बृहत् आराखडा विचारात घेण्याची सूचना केलेली असून त्यांनी ती तत्वत मान्य केलेली आहे. नव्याने प्राध्यापक भरती करताना गुणवत्तेचा विचार प्रामुख्याने केला जाणार आहे. जे राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पात्र ठरतील त्यांना भवितव्य असणार आहे. दहा वर्षे जरी प्राध्यापक म्हणून काम केले असले, तरी ते कायमचे झालेले नाहीत अशांना वाचविण्याचा प्रयत्न केला जाणार नाही, असे टोपे यांनी स्पष्ट केले. स्थानिक उद्योगाची गरज लक्षात घेऊन शासनाने कम्युनिटी कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत १६ कॉलेजना मंजुरी दिली असल्याचे सांगून टोपे म्हणाले, या अंतर्गत दोन वर्षांचा असोसिएट डिग्री हा अभ्यासक्रम तयार केलेला आहे. याबाबत आणखी प्रस्ताव आल्यास त्यांना मान्यता देण्याचा सकारात्मक विचार केला जाईल. नवीन आयटीआय कॉलेजना मान्यता दिली जाणार नाही. विनाअनुदानित आयटीआय कॉलेजना अनुदानित करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत चर्चा झाली आहे. त्यांनी यासाठी किती आर्थिक भार उचलावा लागेल, याचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे.

 ---------------------------------------------------------
स्वत:ला सिद्ध करा, तरच जग सलाम करेल - रतन टाटा
देशाची स्थिती फार चांगली नाही. नैतिक मूल्ये फेकून देऊन सर्वच क्षेत्रांत आपमतलबीपणा वाढला आहे; पण तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका. आपल्याला नैतिकता व मूल्यांवर आधारलेला भारत घडवायचा आहे, एवढेच ध्यानात ठेवा आणि कामाला लागा, असा सल्ला टाटा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष पद्मभूषण रतन टाटा यांनी रविवारी तरुणांना दिला. स्वत:ला सिद्ध करा, मगच जग सलाम करेल, पदवी घेऊन बाहेर पडल्यावर आपण कोणी असामान्य आहोत, जग आदर देईल, या भ्रमात राहू नका. इथे घेतलेल्या ज्ञानाचा नव्या निर्माणासाठी वापर करा, गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट अशाच कल्पकतेतून निर्माण झाल्या आहेत. शिक्षण घेताना विद्यार्थी सुरक्षित वातावरणात असतात पण बाहेर हे वातावरण मिळेल, असे नाही. सगळीकडे आपमतलबीपणा दिसेल तरी तिकडे लक्ष देऊ नका, उद्याच्या जगाचे तुम्ही कर्तेधर्ते आहात. सारे जगच सध्या शिकण्याच्या प्रक्रियेत आहे. तुम्ही इथून बाहेर पडल्यावरही सतत शिकत राहा. कल्पकता, नैतिकता व मूल्येच प्रगतीत उपयोगी ठरणार आहेत, हे ध्यानात ठेवा यातूनच चांगल्या गोष्टींची सुरुवात होते असे ते म्हणाले. इस्लामपूरच्या राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पहिल्या पदवीदान समारंभात टाटा बोलत होते.
---------------------------------------------------------
प्राथमिक शिक्षकाकरिता “शिक्षक पात्रता परीक्षा” ( Teachers Eligibility Test ) अनिवार्य
केंद्र शासनाने २००२ साली पारीत केलेल्या “बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम , २००९” मधील तरतूदिनुसार इथूनपुढे सर्व प्राथमिक प्राथमिक शिक्षकाकरिता (इ. १ ली ते ८ वी) “शिक्षक पात्रता परीक्षा” (Teachers Eligibility Test) अनिवार्य करण्यात आली आहे. “शिक्षक पात्रता परीक्षा” (TET) दरवर्षी आवश्यकते प्रमाणे (किमान एकदा) शासनामार्फत घेण्यात येईल. उत्तीर्ण उमेदवारांना शासनातर्फे शिक्षक पात्रता परीक्षा ( TET ) प्रमाणपत्र देण्यात येईल व या प्रमाणपत्राची वैधता निर्गमित केल्यानंतर सात वर्ष राहणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षा (TET) परीक्षेची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावर सोपविण्यात आली असून सदरील परीक्षा साधारण आक्टोंबर / नोव्हेंबर २०१३ मध्ये घेण्याबाबत शासन निर्णय २३ ऑगस्ट २०१३ रोजी झाला असून उमेदवारांनी डाऊनलोड करून घ्यावा.
अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------
पोलीस भरती म्हणजे आभासी विश्वातील चर्चा- शेवटी अफवाच!
गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ६२००० पोलिसांची भरती करण्याची घोषणा केल्यापासून चर्चेला उधान आले आणि वेगवेगळ्या जागांच्या तपशिलासह अर्ज भरण्याची तारीख ४ आक्टोंबर असल्याचे मेसेज अनेकांच्या मोबाईलवर धडकले तसेच सोशल नेटवर्किंग साइट्‌सवर याबाबत मोठी चर्चा घडवून आणली गेली आणी अजूनही भरतीची तारीख सुद्धा निश्चित झालेली नाही म्हणजेच अनेक दिवसांपासून भरतीची चर्चा अफवाच होती हे मात्र सिद्ध झाले आहे. सोशल नेटवर्किंग साइट्‌स म्हणजे एक आभासी विश्व असून कुठली अधिकृत जाहिरात प्रकाशित होईपर्यंत उमेदवारांनी धावपळ न करता आपल्या करिअरकडे लक्ष्य देणे आवश्यक आहे एवढेच.
---------------------------------------------------------------------------------------------------------
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) बी.एड. प्रवेश पूर्व परीक्षा ०८ सप्टेंबर २०१३ रोजी
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) बी.एड. प्रवेश पूर्व परीक्षा ०८ सप्टेंबर २०१३ रोजी आयोजित केलेल्या परीक्षेची प्रवेश पत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांनी डाऊनलोड करून घ्यावीत.
अधिक माहिती http://stusupport.ignou.ac.in/2013/B_M_Ed/BED.ASP या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
जळगाव - तलाठी भरती लेखी परीक्षा ८ सप्टेंबर २०१३ रोजी होणार
जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या आस्थापनेवरील तलाठी पदाच्या भरतीसाठी घेण्यात येणारी लेखी परीक्षा १ सप्टेंबर २०१३ रोजी आयोजित करण्यात आली होती परंतु त्यादिवशी महानगरपालिका मतदान असल्याकारणाने सदरील लेखी परीक्षा ८ सप्टेंबर २०१३ रोजी सकाळी ११:०० ते १:०० या वेळेत घेण्यात येणार असून परीक्षेची प्रवेशपत्र २ सप्टेंबर पासून ऑनलाईन उपलब्ध होतील, याची सर्व परीक्षार्थींनी नोंद घ्यावी.
अधिक माहिती http://jalgaon.nic.in/Html/recruitment.htm या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
अहमदनगर - तलाठी भरती लेखी परीक्षा ६ आक्टोंबर २०१३ रोजीच होणार
जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील तलाठी पदाच्या भरतीसाठी घेण्यात येणारी परीक्षा १ सप्टेंबर २०१३ रोजी आयोजित करण्यात आली होती परंतु सदरील परीक्षा प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली असून सर्व पदासाठीची लेखी परीक्षा एकाच दिवशी म्हणजे ६ आक्टोंबर २०१३ रोजी घेण्यात येईल याची सर्व परीक्षार्थींनी नोंद घ्यावी.
अधिक माहिती http://ahmednagar.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
सहाय्यक, विक्रीकर निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक (पूर्व) परीक्षा योजना व अभ्यासक्रम जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सहाय्यक, विक्रीकर निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक (पूर्व) परीक्षेसाठी परीक्षा योजना व अभ्यासक्रम जाहीर केला असून उमेदवारांनी सबंधित लिंक्सद्वारे डाऊनलोड करून घ्यावा.अधिक माहिती www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परस्थिती अंथरुणावरील आजारी रुग्णासारखी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभाराचा राज्यातील उमेदवारांना आलेला अलिकडील अनुभव दु:खदायक आहे. आयोगाचे एकच संकेतस्थळ असल्याने ते नेहमीच बंद पडत असून स्टाप सलेक्शन कमिशन प्रमाणे यासोबतच अजून एक संकेतस्थळाची निर्मिती करायला हवी, याप्रमाणेच "एमपीएससी'च्या कार्यप्रणालीत मोठे दोष आहेत ते प्रामाणिकपणे मान्य करून त्यांचे तातडीने निराकरण करणे आवश्‍यक आहे. हा एक-दोन नव्हे लाखो लोकांच्या आयुष्याशी संबंधित असतो. आयोगाची उमेदवारांसाठी हेल्पलाईन असायला हवी आहे तसेच गेल्या अनेक दिवसापासून आयोग किंवा महाऑनलाईन च्या दूरध्वनीवर कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. आयोग किंवा महाऑनलाईन ची कोणतीही हेल्पलाईन चालू नसल्याने हजारो उमेदवारांचे भवितव्य धोक्यात आले आहे. आयोगाच्या अध्यक्षांनी व सचिवांनी परिस्थिती ज्या पद्धतीने हाताळली व हाताळत आहेत त्यासंबंधीही वरिष्ठ पातळीवर विचारमंथन होणे आवश्‍यक आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी आयोगाने खबरदारी घ्यावी. परीक्षेचे फॉर्म ऑनलाइन भरले जाताना विपरीत परिस्थिती उद्‌भवली तर ती हाताळण्यास संगणक क्षेत्रातील तज्ञ आयोगाकडे उपलब्ध असले पाहिजेत, विद्यार्थ्यांना काही अडचण असेल तर त्वरित सोडविण्यासाठी मदत कक्ष किंवा हेल्पलाइन कार्यक्षम बनविणे आवश्‍यक आहे. संघ लोकसेवा आयोगासंदर्भात काही प्रश्‍न उद्‌भवल्यास भारतातील कोणत्याही भागातून फोन केल्यास त्या विद्यार्थ्यांचे तत्काळ समाधान केले जाते. सध्याच्या वेबसाइटमध्ये अनेक त्रुटी आहेत त्या दुरुस्त करून ही सर्व प्रक्रिया सुटसुटीत व कालबद्ध असणे आवश्यक आहे. "एमपीएससी'कडून सरकारला माहिती वेळेवर पोचत नाही, की सरकारकडून पुढची कार्यवाही वेळेत पूर्ण केली जात नाही? कोणास ठाऊक! एकूणच, "एमपीएससी'ची परिस्थिती अंथरुणावर असलेल्या आजारी रुग्णासारखी आहे. तज्ज्ञ व्यक्तींकडून याची तातडीने चिकित्सा व्हावी अशीच उमेदवारांची अपेक्षा आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
परळीच्या भामट्याने 'सीआरपीएफ'मध्ये नोकरीच्या आमिषाने तरुणांना ४७ लाख रुपयांना गंडविले
'सीआरपीएफ'मध्ये नोकरी लावून देण्याच्या आमिषाने बेरोजगारांना तब्बल ४७ लाख ५० हजार रुपयांना गंडविणाऱ्या परळी वैजनाथ (जि. बीड) तालुक्‍यातील भामट्याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की रांजणगाव (शेणपुंजी) येथे शिवाजी मुकुंदराव सोनटक्के (वय ३२) यांच्या सलूनमध्ये रमेश संभाजी सावंत वेळोवेळी येत होता. त्याने आपला जावई सीआरपीएफमध्ये नोकरीस असून त्यांची बदली औरंगाबादला झाल्याचे सांगितले. त्यांना तुमची खोली भाड्याने द्यावी, अशी विनंतीही केली. श्री. सोनटक्के यांनी होकार देत रांजणगाव येथील खोली मार्च २०१२ मध्ये १३०० रुपये महिन्यानुसार धम्मपाल शिवाजी टोम्पे (वय २६, रा. दाऊतपूर, ता. परळी वैजनाथ, जि. बीड) यास भाड्याने दिली. या ठिकाणी धम्मपाल हा पत्नी वर्षा व चार वर्षांच्या मुलासह राहत होता. पोलिसांप्रमाणे बारीक कटिंग, हातात फायबरची काठी, बनावट ओळखपत्र व सीआरपीएफच्या गणवेशातील फोटो आदींतून आपण खरोखरच सीआरपीएफचा जवान असल्याचे धम्मपाल भासवीत होता. त्यामुळे त्याचा परिसरातील नागरिकांशी संपर्क वाढला. सुरवात घरमालकापासूनच करून धम्मपालने घरमालक सोनटक्के यांना विश्वासात घेऊन सिकंदराबाद येथे सीआरपीएफच्या जागा निघाल्या असून भरती करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी माझे चांगले संबंध असल्याचे भासविले. तुमच्या नातेवाइकांपैकी कोणाला नोकरी लावायची असेल तर प्रत्येकी अडीच लाख रुपये लागतील, असे सांगितले. तसेच आपल्यातील संभाषणाची चर्चा करू नका, मोबाईलवर माझ्याशी संपर्क साधू नका, फोन रेकॉर्ड होत असतात, अशी बतावणीही धम्मपालने केली. सलूनचालक सोनटक्के यांचा यावर विश्वास बसला व त्यांनी आपल्या गावाकडील तसेच रांजणगावातील मित्राकडून सुमारे तीन लाख रुपये जमा केले. तसेच आपला ऍपेरिक्षा विकून उर्वरित दोन लाख असे एकूण पाच लाख रुपये सोनटक्के यांनी स्वतःला न्हावी पदावर व पत्नीला शिंपी पदावर नोकरीला लावण्यासाठी भामटा धम्मपालला दिले. चेक देऊन विश्वास संपादन करण्याची पद्धत त्याने वापरून सलूनचालक शिवाजी सोनटक्के यांनी पाच लाखांची रोख रक्कम देताच धम्मपालने परळी येथील आयडीबीआय शाखेचा चेक क्रमांक ०३०६९६ दिला. मी जर तुम्हाला नोकरीला लावू शकलो नाही तर या चेकद्वारे तुमचे पैसे परत घ्या, असे सांगितल्याने सोनटक्के यांचा धम्मपालवरील विश्वास आणखी वाढला आणि सोनटक्के यांचे नातेवाईक देवानंद पांडुरंग सोनटक्के, बंडू मुरलीधर गुळगुळे, गजानन मुरलीधर गुळगुळे, संतोष मुरलीधर गुळगुळे यांच्याकडून अडीच लाख रुपयांप्रमाणे १० लाख रुपये रोख धम्मपाल याने घेऊन त्यांनाही परळीतीलच आयडीबीआय शाखेचा चेक क्रमांक ०३०६९७ व ०३०६९८ असे दोन चेक दिले. रोख रक्कम मिळताच धम्मपाल चेक व समन्सपत्रक देत होता आणि दुसरे पत्रक मिळताच तुम्हाला नोकरी लागेल, असे सांगून विश्वास संपादन करत होता. यानंतर सोनटक्के यांचे मित्र शेख सत्तार यांनीही आपल्या मुलांकरिता अडीच लाख रुपये धम्मपालला दिले. अजय रमेश शिंदे यानेही पैसे दिले. वाळूज महानगरातील अशा एकूण नऊ तरुणांकडून पैसे घेऊन त्यांनाही समन्स पत्र व चेक धम्मपालने दिले. परळीतील अनेक बेरोजगार तरुणांचीही या भामट्याने अशीच फसवणूक केली. सर्वांचे मिळून तब्बल ४७ लाख ५० हजार रुपये घेऊन धम्मपाल अचानक काही दिवसांपूर्वी कुटुंबासह गायब झाला. त्यामुळे घाबरलेले शिवाजी सोनटक्के धम्मपालच्या गावी गेले. त्या ठिकाणी गावकऱ्यांनी धम्मपालने आम्हालाही नोकरीचे आमिष दाखवून फसविल्याचे सांगितले. तसेच धम्मपाल स्वतःच बेरोजगार असल्याचे कळताच भांबावून गेलेल्या सोनटक्के यांनी वाळूज एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार धम्मपाल टोम्पेच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक किशोर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीच्या शोधार्थ गेलेल्या पथकातील फौजदार सुरेश खाडे, हेड कॉंस्टेबल बाळासाहेब आंधळे व उमाकांत चौधरी यांनी परळी ग्रामीण पोलिसांच्या मदतीने धम्मपालला गुरुवारी (ता. २५) दुपारी ताब्यात घेतले. या प्रकरणी जावयास मदत करणाऱ्या रमेश संभाजी सावंत यालाही चौकशीकरिता ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास फौजदार सुरेश खाडे करीत आहेत. (सौजन्य- सकाळ)
------------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अधीक्षक ( शिक्षण सेवा) पदाच्या २७ जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अधीक्षक, उच्च शिक्षण संचनालय, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब (प्रशासकीय सेवा-मंत्रालयीन संवर्ग) च्या २७ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर २०१३ आहे.
अधिक माहिती www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
दत्ता सांगोलकर, श्रद्धा नोट्स व लक्ष्यवेध यांची चालू घडामोडी नवीन आवृत्ती बाजारात उपलब्ध
सध्या स्पर्धा परीक्षांची मोठा प्रमाणात रेल-चेल असून त्यासाठी विविध प्रकाशन ची स्पर्धा परीक्षांची पुस्तके प्रकाशित झाली असून नुकतीच दत्ता सांगोलकर, श्रद्धा नोट्स आणि लक्षवेध यांनी चालू घडामोडी ची आपली नवीन आवृत्ती प्रकाशित केली असून अनुक्रमे 65/-, 80/- आणि 55/- रुपये अशी त्यांची किंमत असून अगदी वेळेत नवीन आवृत्ती बाजारात उपलब्ध झाल्याने उमेदवारांकडून या पुस्तकांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.