नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

टी.ई.टी. विशेषांक

विद्याभारती व नवदीप पब्लिकेशन्स यांचे सुद्धा  टी.ई.टी परीक्षासाठी पुस्तक उपलब्ध
-------------------------------------------------------------------------------------------------------------
सायस कराड यांचे टी.ई.टी परीक्षासाठी पुस्तक उपलब्ध
सायस कराड पब्लिकेशन द्वारा प्रकाशित टी.ई.टी परीक्षासाठी पेपर १ (वर्ग १ ते ५ शिक्षकासाठी) पुस्तक प्रकाशित झाले आहे. सदरील पुस्तक प्रा.सायस कराड स्वलिखित व महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने मंजूर केलेल्या अभ्यासक्रमवार आधारित असणारे हे पुस्तक बाजारात उपलब्ध असल्याने याला मागणी जोरात असून पुस्तकाची किंमत २२०/- रुपये आहे.
पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी 9405043111 क्रमांकावर संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी सायस कराड पब्लिकेशन्स च्या वेबसाईट ला भेट द्या... Website - www.governmentjobbooks.com
------------------------------------------------------------------------------------------------------------
जर आपण अगोदरच नोंदणी केली असेल तर लॉग इन  करा...
ऑनलाईन भरलेला अर्ज प्रिंट करा...पुष्टीकरण पृष्ठ प्रिंट

ऑनलाईन अर्ज स्विकृती ११.११.२०१३ पर्यंत

तुम्ही जर विसरलात तर...
--------------------------------------------------------
मदत डेस्क
मोबाईल क्रमांक: ७७७४०१२४५१, ७७७४०१२४५२
(सकाळी ९.०० ते रात्री ९.००)

संपर्क
पत्ता :
आयुक्त(परीक्षा परिषद),
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
१७, डॉ. आंबेडकर मार्ग,
पुणे - ४११ ००१
दूरध्वनी क्रमांक: ०२०-२६१२३०६६
फॅक्स : ०२०-२६१२९९१९ 

महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2013

महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2013महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2013
Maharashtra State Teacher Eligibility Test - 2013


महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी मान्यताप्राप्त अनुदानित / विनाअनुदानित / कायम विनानुदानित कनिष्ठ प्राथमिक (इ.१ ली ते ५ वी ) व वरिष्ठ प्राथमिक (इ. ६ वी  ते इ. ८वी) शाळांमधील (इयत्ता १ली ते ८वी ) सर्व माध्यमांतील शिक्षक पदांकरिता फक्त पात्रता प्रमाणपत्र मिळविण्याकरिता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेस (MAHATET) प्रविष्ठ होण्याकरिता  उमेद्वारंकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

पात्रता : डी. एड. / बी. एड. उत्तीर्ण

प्रतामिक/ माध्यमिक / उच्च माध्यामिक अशा विविध स्तरावरील शाळांकरिता शिक्षक या पदाकरिता आवश्यक अर्हता - शासन निर्णय

शिक्षक पात्रता परीक्षेची कार्यपद्धती - शासन निर्णय

वेळापत्रक : 

१.ऑनलाइन अर्ज करणेचा अंतिम दिनांक११.११.२०१३
२.जिल्हा शिक्षण अधिकारी यांचे कार्यालय कडून अर्ज Confirm करणेचा अंतिम दिनांक १५.११.२०१३  
३.अर्जाची स्थिती व उमेदवाराची माहिती पाहणेचा अंतिम दिनांक१७.११.२०१३
४.प्रवेशपत्र  डाउनलोड करणेचा अंतिम दिनांक१४.१२.२०१३ 
५. परीक्षा दिनांक१५.१२.२०१३

अंतिम दिनांक : Nov.11.2013
टीप : उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावा

New Current Jobs

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' http://www.jobsmarathi.org/ या संकेस्थळाच्या डोमेनवर काम चालू असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी च्या वेबसाईट ला अडचण येत असेल तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेननेम चा वापर करून वेबसाईट ओपन करावी...
--------------------------------------------------------------------------------------------
कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागात कंत्राटी चालकाच्या ७५ जागा
कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या वाहतूक विभागाकडे कंत्राटी पद्धतीने चालकाच्या ७५ जागा भरण्यासाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या असून चौथी पास, हेवी ड्रायविंग लायसेन्स व ब्याच असलेल्या उमेदवारांनी ८ नोव्हेंबर २०१३ रोजी परिवहन उपक्रम, मुख्य यंत्रशाळा, शास्त्रीनगर, कोल्हापूर येथे विहित नमुन्यातील अर्ज, कागद पत्रांच्या मुळ व छायांकित प्रतीसह वाहन चलन परीक्षेसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
एम.सी.ई.डी. पोर्टलवर उपजीविका तज्ञ व कृषी / वन तज्ञ पदांच्या जागा
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत वसुंदरा पाणलोट विकास संस्थेमार्फत पाणलोट विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्रातील ३३ जिल्ह्यातून एम.सी.ई.डी. पोर्टलवर उपजीविका तज्ञ व कृषी व वन तज्ञ असे दोन सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०१३ आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयात १९१ जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातील प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी/सहाय्यक संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण- तांत्रिक ३२ जागा, प्राचार्य व उपप्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था / मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक विद्यालय / केंद्र निरीक्षक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी / सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार-तांत्रिक ७१ जागा, प्राचार्य व उपप्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था / मुख्याध्यापक/ अभियांत्रिकी अधीक्षक, टेक्निकल हायस्कूल / केंद्र ८८ जागा असे एकूण १९१ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ नोव्हेंबर २०१३ आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र शासन मोटार वाहन विभागात (आरटीओ) लिपिक आणि टंकलेखक भरती...
महाराष्ट्र शासन मोटार वाहन विभागात लिपिक आणि टंकलेखक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्यानुसार तब्बल २०८ जागा भरण्यात येणार आहेत. प्रादेशिक परिवहन विभागांच्या आस्थापनेवरील गट ‘क’मधील लिपिक-टंकलेखक या संवर्गातील रिक्त पदांच्या जागांसाठी सरळसेवा भरती करण्यात येणार आहे.
ऑनलॉईन अर्ज सादर करण्याचा कालावधी २८ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर २०१३ दरम्यान आहे.
तर जाहिरातीचा तपशील http://oasia.mkcl.org/rto2013 वर पाहायला मिळेल.
तर मोटार वाहन विभागाचे संकेतस्थळ http://www.mahatraanscom.in/ यावर अधिक माहिती मिळू शकेल.
------------------------------------------------------------------------------------------------------------
कोल्हापूर सैन्यभरती मेळाव्याचे ४ ते ११ जानेवारी २०१४ दरम्यान आयोजन
कोल्हापूर सैन्यभरती मेळाव्याचे आयोजन कवठेमहांकाळ येथे ४ ते ११ जानेवारी २०१४ या दरम्यान केले असून सोल्जर (जीडी) साठी दहावी पास, क्लार्क साठी बारावी ५०% मार्क, टेक्निकल/ नर्सिंग साठी बारावी विज्ञान आणि ट्रेडमन साठी आठवी, दहावी पास उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या सांक्षाकित प्रतीसह संबंधित तारखेस कवठेमहांकाळ, जि.सांगली येथे उपस्थित राहणे आवश्यक आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
अमरावती येथे ६ ते १३ नोव्हेंबर २०१३ दरम्यान सैन्यभरती मेळावा
अमरावती येथे ६ ते १३ नोव्हेंबर २०१३ या दरम्यान सैन्य भरती आयोजित केली असून सदरील भारती केवळ वाशीम (६/११), अमरावती (७/११), भंडारा व गोंदिया (८/११), वर्धा व गडचिरोली (९/११), चंद्रपूर (१०/११), नागपूर (११/११), यवतमाळ (१२/११) आणि अकोला (१३/११) याप्रमाणे सदरील जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांसाठी असून सोल्जर (जीडी) साठी दहावी पास, क्लार्क साठी बारावी ५०% मार्क, टेक्निकल/ नर्सिंग साठी बारावी विज्ञान आणि ट्रेडमन साठी आठवी, दहावी पास उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या सांक्षाकित प्रतीसह संबंधित तारखेस जिल्हा क्रीडा संकुल, अमरावती येथे सकाळी ४ वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
अंबरनाथ ऑर्डनन्स ओर्डीनन्स डेपो मध्ये ट्रेडमन पदाच्या १४९ जागा
ऑर्डनन्स ओर्डीनन्स डेपो, अंबरनाथ, जि. ठाणे मध्ये इलेक्ट्रिशियन १४ जागा, एक्झामिनर १४ जागा, माशिनिष्ट ८९ जागा व इतर २१ जागा अशा ट्रेडमन पदाच्या एकूण १४९ जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ४ नोव्हेंबर २०१३ आहे.
जाहिरात पहा... हिंदी मध्ये..... इंग्रजी मध्ये.....
------------------------------------------------------------------------------------------------------------
जिल्हा ग्राहक तक्रार मंच गैर न्यायिक सदस्यांच्या ३३ जागा
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा ग्राहक तक्रार मंचावरील गैर न्यायिक सदस्य ३३ जागा विहित निवड प्रक्रियेने नियुक्ती करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून संपूर्ण भरलेला अर्ज १३ नोव्हेंबर २०१३ पूर्वी प्राप्त होतील अशा बेताने नोंदणीकृत/ शीघ्र डाकेने पाठवणे आवश्यक आहेत.
------------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र राज्य शासनाच्या उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने लिपिक – टंकलेखक पदाच्या रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहे. रिक्त ५८ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. सरळसेवा भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी २४ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०१३ आहे. तर संगणकीय चलनाद्वारे शुल्क भरण्याचा कालावधी २४ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर २०१३ आहे. ज्यांचे अर्ज दिनांक ७ नोव्हेंबर रोजी दाखल झाले आहेत व ज्या उमेदवारांनी बँकेमध्ये ८ नोव्हेंबरपर्यंत भरती प्रक्रिया शुल्क जमा केले असेल त्यांच्यासाठी उरलेला ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम कालावधी ११ नोव्हेंबर २०१३ आहे.
अधिक माहिती MKCL या संकेतस्थळाच्या http://oasis.mkcl.org/excise2013 साईटवर उपलब्ध आहे.
अधिक वाचा - http://zeenews.india.com/marathi/news
------------------------------------------------------------------------------------------------------------
विक्रीकर निरीक्षक (पूर्व) परीक्षा - परीक्षेच्या दिनांकात बदल...
लोकसेवा आयोगामार्फत विक्रीकर विभागातील ८३ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या विक्रीकर निरीक्षक (पूर्व) परीक्षा - २०१३ करिता आयोगाच्या संकेतस्थळावर तसेच वृत्तपत्रामध्ये दि.१-१०-१३ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत प्रस्तुत परीक्षेचा दिनांक २४ नोव्हेंबर, २०१३ रोजी असल्याबाबत नमूद करण्यात आले आहे. तथापि, दिनांक २४ नोव्हेंबर, २०१३ रोजी रेल्वेसेवा भरतीची परीक्षा मुंबईसह सर्व जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार असल्यामुळे सदर परीक्षा दिनांक २२ डिसेंबर,२०१३ रोजी आयोजित करणेबाबत आयोगाने निर्णय घेतला आहे.
सदर विक्रीकर निरीक्षक (पूर्व) परीक्षेच्या दिनांक बदलाबाबतची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
------------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली कार्यालयात वाहनचालकाची १ जागा
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या अधिनस्त असलेल्या महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली कार्यालयातील वाहन चालक (१ जागा) या पदासाठी अर्ज मागविण्याच्या तारखेत बदल झाला आहे.
या पदासाठी अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 22 नोव्हेंबर 2013 आहे.
यासंबंधीची अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात विविध पदाच्या १८ जागा
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील उप वस्तूशास्त्रज्ञ १ जागा, उप रचनाकार २ जागा, सहायक वस्तूशास्त्रज्ञ ६ जागा, सहायक रचनाकार ९ जागा असे एकूण १८ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०१३ आहे. 
------------------------------------------------------------------------------------------------------------
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय परीक्षा गुणांक यादी
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय अस्थापनेवरील तलाठी,लिपिक-टंकलेखक भरतीसाठी ६ आक्टोंबर २०१३ रोजी घेण्यात आलेल्या परीक्षाची स्वतंत्र गुणांक यादी प्रसिद्ध करण्यात आली असून उमेदवारांना ती डाऊनलोड करता येईल.
------------------------------------------------------------------------------------------------------------
अर्थ व सांख्यिकी संचनालय, नियोजन विभागात ५० जागांची भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अर्थ व सांख्यिकी संचनालय, नियोजन विभाग, मुंबई कार्यालयाच्या आस्थापनेवरील संशोधन अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी/ अस्थापना अधिकारी/ सख्यीकी अधिकारी (निरीक्षण), जिल्हा सख्यीकी अधिकारी, सामान्य राज्यसेवा गट-ब या संवर्गातील एकून ५० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०१३ आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
मुंबईतील माझगाव डॉकमध्ये विविध पदांच्या ३९ जागा
मुंबईतील माझगाव डॉक येथे मुख्य व्यवस्थापक ४ जागा, व्यवस्थापक ६ जागा, उपसव्यवस्थापक ८ जागा, सहायक व्यवस्थापक ९ जागा, वरिष्ठ अभियंता ९ जागा, कल्याण अधिकारी २ जागा, सुरक्षा अधिकारी १ जागा असे एकून ३९ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०१३ आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
राज्य शिक्षक पात्रता (टी.ई.टी.) परीक्षा - ऑनलाईन अर्ज प्रणाली
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता (टी.ई.टी.) परीक्षा–२०१३ रविवार १५ डिसेंबर २०१३ रोजी घेण्यात येणार असून या परीक्षेस समाविष्ट होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०१३ आहे.
टी.ई.टी.च्या अधिक माहितीसाठी 'जॉब्स मराठी'ने स्वतंत्र पेज सुविधा उपलब्ध करून दिली आहे...भेट द्या...
------------------------------------------------------------------------------------------------------------
केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड, दिल्ली मार्फत केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा
केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड, दिल्ली मार्फत केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा १६ फेब्रुवारी २०१४ रोजी आयोजित करण्यात आली असून या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख ३१ आक्टोंबर २०१३ आहे.
सूचना पहा - - हिंदी मध्ये...  व  इंग्रजी मध्ये...  जाहिरात पहा - - हिंदी मध्ये...    इंग्रजी मध्ये...
------------------------------------------------------------------------------------------------------------
यवतमाळ जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आस्थापनेवर कंत्राटी पदाच्या १० जागा
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, यवतमाळ यांच्या आस्थापनेवरील लेखापाल ४ जागा व डाटा एन्ट्री ऑपरेटर ६ जागा अशी एकूण १० पदे कंत्राटी स्वरुपात करार पद्धतीने एकत्रित मानधनावर भरण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ३१ आक्टोंबर २०१३ आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
नांदेड येथे १९ ते २८ नोव्हेंबर दरम्यान सैन्यभरती मेळावा
औरंगाबाद, बुलढाणा, धुळे, हिंगोली, जालना, नांदेड, जळगाव, नंदुरबार व परभणी या जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या तरुण युवकांसाठी नांदेड येथे १९ ते २८ नोव्हेंबर या दरम्यान सैन्य भरती होणार असून उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या सांक्षाकित प्रतीसह संबंधित तारखेस श्री गुरुगोविंदसिंग स्टेडियम नांदेड येथे उपस्थित रहावे. सकाळी ४ ते सकाळी ७ पर्यंतच प्रवेश दिला जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
------------------------------------------------------------------------------------------------------------
चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कंत्राटी पदाच्या ९ जागा
जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर मार्फत अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थिनीकरिता बांधण्यात आलेल्या वसतीगृहासाठी अधीक्षक १ जागा, लिपिक १ जागा, शिपाई १ जागा, सफाई कामगार २ जागा आणि वॉचमन ४ जागा असे एकून ९ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख १ नोव्हेंबर २०१३ आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
विक्रीकर निरीक्षक (पूर्व) परीक्षा - अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ
लोकसेवा आयोगामार्फत विक्रीकर विभागातील ८३ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या विक्रीकर निरीक्षक (पूर्व) परीक्षा - २०१३ साठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता शेवटची तारीख २८ आक्टोंबर २०१३ आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र लोकसेवा आयोग - स्पर्धा परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेचे वेळापत्रक निश्चित केले असून त्यानुसार महाराष्ट्र अभियांत्रिकी (स्थापत्य) सेवा परीक्षा- २०१३ आणि पोलीस उपनिरीक्षक (मर्यादित) परीक्षा- २०१३ या दोन्ही परीक्षा २० अक्टोबर २०१३ रोजी घेण्यात येणार असून राज्यसेवा (मुख्य) परीक्षा- २०१३ ही परीक्षा २६, २७ व २८ अक्टोबर २०१३, सहायक धर्मादाय परीक्षा- २०१३ ही परीक्षा ०१ डिसेंबर २०१३, पोलीस उपनिरीक्षक (मुख्य) परीक्षा- २०१३ ही परीक्षा ०८ डिसेंबर २०१३, सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा- २०१३ ही परीक्षा १५ डिसेंबर २०१३, विक्रीकर निरीक्षक (पूर्व) परीक्षा- २०१३ ही परीक्षा २२ डिसेंबर २०१३ तसेच उपशिक्षणाधिकारी चाळणी परीक्षा- २०१३ ही परीक्षा ०५ जानेवारी २०१३ रोजी घेण्याचे आयोगाने निश्चित केले आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
अमरावती पुरवठा विभागात पुरवठा निरीक्षकांच्या ४० जागा
अन्न व नागरी पुरवठा विभाग, अमरावती आस्थापनेवरील पुरवठा निरीक्षक संवर्गातील ४० पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ आक्टोंबर २०१३ आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
भारतीय रेल्वेच्या भुवनेश्वर विभागात १६२६ जागांची भरती
भारतीय रेल्वेच्या भुवनेश्वर विभागात ग्रुप-डी पदाच्या एकूण १६९६ भरण्यासाठी एस.एस.सी. किंवा आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख ११ नोव्हेंबर २०१३ आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
स्टील अथोरिटी ऑफ इंडिया मध्ये टेक्निकल पदाच्या ५५० जागा
स्टील अथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये शिकावू टेक्निकल पदाच्या ५५० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ नोव्हेंबर २०१३ आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात कंत्राटी ५८ जागांसाठी थेट भरती
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात उदवाहनचालक - उदंचनचालक नि तारतंत्री २१ जागा, तारतंत्री ३ जागा, वीजतंत्री ८ जागा, वीजतंत्री-प्रथम श्रेणी रुग्णालय १४ जागा, भट्टीचालक ९ जागा आणि वीजतंत्री विद्युतदाहिनी ३ जागा असे एकून ५८ पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत.
यासाठी दि. २३ आणि २४ ऑक्टोंबर २०१३ रोजी थेट भरती होणार आहे.
यासंबंधीची जाहिरात दि. १७ ऑक्टोंबर २०१३ रोजी दै. सकाळ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात विविध ९३ जागांची भरती
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई यांच्या कार्यालयातील गट- अ, ब, क, ड मधील शासन मान्य एकून ९३ रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ आक्टोंबर २०१३ आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
भारतीय रेल्वेच्या कोलकाता विभागात २८३० जागांची भरती
भारतीय रेल्वेच्या कोलकाता विभागात ग्रुप-डी पदाच्या एकूण २८३० भरण्यासाठी एस.एस.सी. किंवा आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०१३ आहे. 
------------------------------------------------------------------------------------------------------------
राज्य उत्पादन शुल्क, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला मध्ये ७ जागा
राज्य उत्पादन शुल्क, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला अंतर्गत जवान ७ जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ आक्टोंबर २०१३ आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
लोकसेवा आयोगामार्फत सहायक मोटार वाहन निरीक्षकाच्या २१५ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २१५ पदे भरण्यासाठी "सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा- २०१३" ही एकच मुख्य परीक्षा मुंबई, औरंगाबाद, नागपूर व पुणे या चार केंद्रावर १५ डिसेंबर २०१३ रोजी घेण्यात येणार आहे.
सदर परीक्षेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १ नोव्हेंबर २०१३ आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम विभागात १२९९ ट्रॅकमन व हेल्पर पदासाठी भरती
भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम, हुबळी विभागात ट्रॅकमन व हेल्पर पदाच्या एकूण १२९९ भरण्यासाठी १०वी किंवा आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख २८ ऑक्टोबर २०१३ आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या १८८१ जागा
महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी यांची १८८१ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ आक्टोंबर २०१३ आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा (गट-अ) भरती १४९ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यातील शासकीय तंत्र निकेतन, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा , गट-अ, उच्च व तंत्र शिक्षण विभागातील माहिती तंत्रज्ञान १४ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी ३२ जागा, संगणक अभियांत्रिकी २६ जागा, यंत्र अभियांत्रिकी ३७ जागा, अणुविद्युत ३८ जागा व धातूशास्त्र २ जागा असे एकूण १४९ पदांच्या सरळसेवा भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ आक्टोंबर २०१३ आहे.
जाहिरात पहा...