नोकरी / रोजगार यांची जाहिरात व माहिती देणारी मराठी वेबसाईट

विशेष सूचना - 'जॉब्स मराठी' या संकेस्थळाच्या डोमेन ला अडचण असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यात जर जॉब्स मराठी http://www.jobsmarathi.org/ या डोमेन वर ओपन होत नसेल, तर www.jobsmarathi.blogspot.com किंवा www.jobsmarathi.tk या दोन डोमेन नेम वर ओपन करावे...

महत्वाची-सूचना

नवीन नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

हि संधी सोडू नका! आजच फेसबुक पेजला लाईक करा...

https://www.facebook.com/jobsmarathi & https://www.facebook.com/groups/jobsmarathi/

जॉब्स मराठी संपर्क - काहीही अडचण आल्यास लगेच ईमेल करा- jobsmarathi@gmail.com

NEW JOBS

बारावी परीक्षेत मुलीच आघाडीवर; महाराष्ट्र राज्याचा निकाल ७२.५३ टक्के...
पुणे - कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा संप, उशिरा सुरू झालेले उत्तरपत्रिका तपासणीचे काम, अशी आव्हाने पेलत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (गुरूवार) जाहीर केला. बारावीचा राज्याचा निकाल यंदा ७२.५३ टक्के लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आज सकाळी ११ वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर हा निकाल जाहीर करण्यात आला. यंदाच्या परीक्षेतही मुलींनीच बाजी मारली आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ७८.८२ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर, ६७.८५ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. विभागवार निकालामध्ये यंदा कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा ८२.६२ टक्के निकाल लागला आहे. तर, पुणे ७५.७७ टक्के, नागपूर ६५.०६ औरंगाबाद ७७.८८, मुंबई ६९.०६, कोल्हापूर ७८.६१, अमरावती ६९.९२, नाशिक ७३.४६, लातूर ७५.४१ टक्के निकाल लागला आहे. बारावीच्या परीक्षेला बसलेल्या १२ लाख ७६ हजार ३५६ विद्यार्थ्यांपैकी ९ लाख २५ हजार ७४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.सहा जून रोजी कनिष्ठ महाविद्यालयांना तपशीलवार गुणांचे अभिलेख आणि विद्यार्थ्यांचे गुणपत्रक देण्यात येईल. याच दिवशी दुपारी तीनपासून विद्यार्थ्यांना त्यांचे गुणपत्रक वितरित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करायची असेल, तर मूळ गुणपत्रिका मिळाल्यानंतर १७ जूनपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करता येतील. इंटरनेटवरील गुणपत्रिकेच्या आधारे गुणपडताळणी करता येणार नाही, असे मंडळाचे विभागीय सचिव अनिल गुंजाळ यांनी स्पष्ट केले आहे. परीक्षेत सर्व विषयांत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारणेसाठी ऑक्‍टोबर २०१३ आणि मार्च २०१४ अशा दोन संधी उपलब्ध करून देण्यात येतील, असेही गुंजाळ यांनी सांगितले. (सौजन्य- सकाळ )
------------------------------------------------------------------------------------------------------------
मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर शिपाई/हमालाच्या १९४ जागा
मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर शिपाई/हमाल १९४ जागा भरण्यात असून अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ७ जून २०१३ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. २० मे २०१३ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
जाहिरात पहा... 
------------------------------------------------------------------------------------------------------------
नेशनल इन्सुरन्स कंपनी मध्ये सहाय्यक पदाच्या २६०० जागा
नेशनल इशोरंस कंपनी मध्ये पदवी झालेल्या किंवा ६०% पेक्षा जास्त मार्क घेऊन पास झालेल्या उमेदवारांसाठी सहाय्यक पदाच्या २६०० जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची तारीख ८ जून २०१३ असून १४ जुलै २०१३ ते २१ जुलै २०१३ दरम्यान लेखी परीक्षा घेण्यात येतील
------------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात 438 जागा
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत राज्यातील दहा जिल्ह्यात जिल्हास्तरावर जिल्हा अभियान व्यवस्थापक (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक-उपजीविका/कृषी (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक-उपजीविका/ बिगर कृषी (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक- क्षमता बांधणी (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक- सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक - संनियंत्रण व मुल्यांकन (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक- माहिती व्यवस्थापन प्रणाली (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक- आर्थिक समावेशन (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक-ज्ञान व्यवस्थापन (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक- विपणन (10 जागा), जिल्हा व्यवस्थापक-रोजगार व कौशल्य विकास (10 जागा), कार्यालय अधीक्षक तथा जिल्हा व्यवस्थापक- संपादणूक (10 जागा) तसेच तालुका स्तरावर तालुका अभियान व्यवस्थापक (30 जागा), तालुका व्यवस्थापक - उपजीविका (30 जागा), तालुका व्यवस्थापक - क्षमता बांधणी (30 जागा), तालुका व्यवस्थापक - सामाजिक समावेशन व संस्थीय बांधणी (30 जागा), तालुका व्यवस्थापक - माहिती व्यवस्थापन प्रणाली व संनियंत्रण व मुल्यांकन (30 जागा), तालुका व्यवस्थापक - आर्थिक समावेशन (30 जागा) आणि क्लस्टर कोऑर्डिनेटर (138 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2013 आहे. अधिक माहिती http://www.jobs.msrlm.org/job https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

------------------------------------------------------------------------------------------------------------
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये 19 जागा
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये नियोजक (2 जागा), उपनियोजक (8 जागा), सहायक पणन व्यवस्थापक (1 जागा), उपलेखापाल (8 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 14 मे 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------
बार्टी संस्थेमार्फत दक्षिण मुंबई कार्यालयात लिपिक टंकलेखक/संगणक ऑपरेटरच्या 11 जागा
पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) या संस्थेमार्फत दक्षिण मुंबई येथील कार्यालयात लिपिक टंकलेखक/संगणक ऑपरेटर (11 जागा) हे पद तात्पुरत्या करार तत्वावर भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखत दि. 21 मे 2013 रोजी होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 14 मे 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ चा निकाल जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१२ मध्ये घेतलेल्या मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल सोमवारी जाहीर झाला. यात सातारा येथील अमित तानाजी शेडगे ५८८ गुणांसह राज्यात प्रथम आले आहेत. सातारा येथीलच विकास दिंडोराम सूर्यवंशी (५४५ गुण) द्वितीय, तर तृतीय क्रमांक सतीश विश्वनाथ शितोळे (५३३ गुण) यांनी पटकावला.मुलींमध्ये शृंगी नीलेश भास्कर प्रथम (५२० गुण), कलाल सचिन उमाजी द्वितीय (५२० गुण) व बीड जिल्हय़ातील केजच्या नम्रता देविदास चाटे यांची तृतीय स्थानी (४८८ गुण) निवड झाली आहे. परतूर येथील अविशकुमार महादेवराव सोनोने (५३०) गुणांसह मागासवर्गीयांतून प्रथम आले आहेत.निकालानुसार ४२ जणांची उपजिल्हाधिकारी, तर ४० जणांची पोलिस उपअधीक्षकपदी निवड झाली आहे. १२६ जण राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक, जिल्हा उपनिबंधकपदी ९, उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी ७, वित्त व लेखा अधिकारीपदी ३१, नगर पालिका मुख्याधिकारीपदी ८, तहसीलदारपदी ३६, गटविकास अधिकारी (ग्रुप बी) ३, नगरपालिका मु्ख्याधिकारी (ग्रुप बी) २९, सहायक निबंधक सहकार (ग्रुप बी) १९, भूमी अभिलेख उपअधीक्षक (ग्रुप बी) ६, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक (ग्रुप बी) एक, राज्य उत्पादनशुल्क उपआयुक्त (ग्रुप बी) २, तर नायब तहसीलदार पदावर १७ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने रिट याचिकेवर दिलेल्या आदेशानुसार एमपीएससीने हा निकाल जाहीर केला. (सौजन्य: दिव्य मराठी)
------------------------------------------------------------------------------------------------------------
जळगाव जिल्हा परिषद मध्ये ९० जागांची भरती
जळगाव जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील कृषी अधिकारी १ जागा, कृषी विस्तार अधिकारी ८ जागा, औषध निर्माण अधिकारी १ जागा, आरोग्य सेवक ३ जागा, शिक्षण विस्तार अधिकारी १ जागा, आरोग्य सेविका १६ जागा, कंत्राटी ग्रामसेवक १३ जागा, वरिष्ठ सहाय्यक १ जागा, कनिष्ठ सहाय्यक २ जागा, स्थापत्य ८ जागा, कनिष्ठ अभियंता (बांधकाम) ८ जागा, परिचर २६ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मे २०१३ आहे.
जिल्हानिवड समिती, जिल्हा परिषद, जळगांव अंतर्गत सरळसेवा पदभरती २०१३ -जाहिरात
ऑनलाईन अर्ज प्रणाली करीता लिंक
------------------------------------------------------------------------------------------------------------
भंडारा जिल्हा परिषदेत ८४ जागा
जाहिरात पहा... 
------------------------------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र पोलिस भरती शारीरिक चाचणी प्रवेश पत्र उपलब्ध
महाराष्ट्र राज्यातील पोलिस भरती शारीरिक चाचणी चा कार्यक्रम लवकरच चालू होत असून राज्य राखीव बल गट करीता शारीरिक चाचणी १० मे २०१३ पासून सुरु होत असून यवतमाळ जिल्हा सोडून इतर सर्व पोलीस आयुक्तालय व जिल्हा पोलीस घटकांकरिता शारीरिक चाचणी १३ मे २०१३ पासून सुरु होत आहे, सदरील शाररीक चाचणीचे प्रवेश पत्र उपलब्ध झाले असून उमेदवारांनी ते डाऊनलोड करून घ्यावेत. 
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
अहमदनगर जिल्हा परिषद मध्ये २८९ जागांसाठी भरती
अहमदनगर जिल्हा परिषद आस्थापनेवरील वरिष्ठ सहाय्यक (लिपिक) ७ जागा, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) १० जागा, लघु नि टंकलेखक १ जागा, कनिष्ठ सहाय्यक (लेखा) ७ जागा, औषध निर्माता ११ जागा, आरोग्य सेवक (पुरुष) २८ जागा, विस्तार अधिकारी (पंचायत) ४ जागा, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) २ जागा, कंत्राटी ग्रामसेवक ६० जागा, कृषी अधिकारी ४ जागा, कृषी विस्तार अधिकारी ७ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ६ जागा, कनिष्ठ आरेखक १ जागा, पर्यवेक्षिका ६ जागा, शिक्षण विस्तार अधिकारी ६ जागा, परिचर ९१ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मे २०१३ आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
गडचिरोली जिल्हा परिषद मध्ये ९४ जागांची भरती
गडचिरोली जिल्हा परिषद आस्थापनेवरील कृषी अधिकारी १ जागा, कृषी विस्तार अधिकारी १ जागा, प्रयोग शाळा तंत्रज्ञ १ जागा, औषध निर्माण अधिकारी ३ जागा, आरोग्य सेवक (महिला) २० जागा, कंत्राटी ग्रामसेवक ६ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक २४ जागा, पशुधन पर्यवेक्षक ५ जागा, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) ८ जागा, लघुलेखक (उ.श्रे) १ जागा, कनिष्ठ लेखा १ जागा, परिचर २३ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मे २०१३ आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
जिल्हा निवड समितीमार्फत अहमदनगर जिल्हा परिषदेतील 289 जागांसाठी भरती
जिल्हा निवड समितीमार्फत अहमदनगर जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहाय्यक लिपिक (7 जागा), कनिष्ठ सहाय्यक- लिपिक (10 जागा), लघु नि टंकलेखक (1 जागा), कनिष्ठ सहाय्यक-लेखा (7 जागा), औषध निर्माता (11 जागा), आरोग्य सेवक पुरुष - हंगामीमधून (23 जागा), आरोग्य सेवक पुरुष (5 जागा), आरोग्य सेवक-महिला (38 जागा), विस्तार अधिकारी- पंचायत आणि समाजकल्याण (4 जागा), विस्तार अधिकारी-सांख्यिकी (2 जागा), कंत्राटी ग्रामसेवक (60 जागा), कृषि अधिकारी (4 जागा), विस्तार अधिकारी - कृषी (7 जागा), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (6 जागा), कनिष्ठ आरेखक (1 जागा), पर्यवेक्षिका (6 जागा), विस्तार अधिकारी - शिक्षण (6 जागा), परिचर (91 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 मे 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. नवाकाळमध्ये 8 मे 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती https://oasis.mkcl.org/zp२०१३ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुणे विद्यापीठात सरळसेवेद्वारे शिक्षकेतर सेवकांच्या 63 जागा
पुणे विद्यापीठात सरळसेवेद्वारे शिक्षकेतर सेवकांची उप वित्त व लेखा अधिकारी (1 जागा), उपकुलसचिव (7 जागा), अंतर्गत हिशोब तपासणीस (1 जागा), जनसंपर्क अधिकारी (1 जागा), सहायक कुलसचिव (14 जागा), सहायक वित्त अधिकारी (1 जागा), प्रोग्रॅमर (8 जागा), आरोग्य अधिकारी (1 जागा), उप अभियंता -विद्युत (1 जागा), कर्मशाळा अधिक्षक (1 जागा), सहायक अभियंता-विद्युत (1 जागा), कक्षाधिकारी -सर्वसाधारण (20 जागा), कक्षाधिकारी-लेखा (6 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2013 आहे. अधिक माहिती http://www.unipune.ac.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
साहित्य अकादमीमध्ये प्रादेशिक सचिवाच्या 2 जागा
केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत असलेल्या साहित्य अकादमीमध्ये कोलकत्ता व मुंबई कार्यालयात प्रादेशिक सचिव (2 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसात करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 6 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.sahitya-akademi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
रत्नागिरी येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठात ६७ जागा
रत्नागिरी येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या कार्यालयांमध्ये कार्यालय अधिक्षक (4 जागा), सहाय्यक अधिक्षक ५ जागा, लघुलेखक ५ जागा, कनिष्ठ अभियंता-स्थापत्य २ जागा, कनिष्ठ अभियंता-विद्युत १ जागा, वरिष्ठ लिपिक ८ जागा, वाहनचालक ६ जागा, आरेखक-स्थापत्य १ जागा, अनुरेखक २ जागा, इंजिन चालक १ जागा, कर्षित्रचालक ४ जागा, मिस्त्री २ जागा, सुतार १ जागा, दृकश्राव्यचालक १ जागा, विजतंत्री १ जागा, सांधाता १ जागा, कातारी १ जागा, छायाचित्रकार १ जागा, यंत्रचालक बोट १ जागा, पशुधन पर्यवेक्षक १ जागा, तांडेल १ जागा, बोटमन १ जागा, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक २ जागा, प्रयोगशाळा सहाय्यक २ जागा, माळी ३ जागा, स्वच्छक १ जागा, क्षेत्र संग्राहक १ जागा, खानसामा १ जागा, सफाईगार ४ जागा, मजूर २ जागा भरण्यात येणार असून अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ३ मे २०१३ आहे.
जाहिरात पहा...
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
कोकण रेल्वे कार्पोरेशनमध्ये २ जागा
कोकण रेल्वे कार्पोरेशनमध्ये उप मुख्य पर्सनल अधिकारी (१ जागा), मुख्य जनसंपर्क अधिकारी (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 मे 2013 आहे. यासंबंधीचा अधिक माहिती http://www.konkanrailway.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत १७ जागांची भरती...
पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत अधिष्ठाता- चित्रपट-१ जागा, प्रोफेसर- ३ जागा, सहयोगी प्राध्यापक- ४ जागा, सहायक प्राध्यापक- ८ जागा, चित्रपट संशोधन अधिकारी- १ जागा इत्यादी पदे भरण्यात येणार असून त्यासाठी अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २३-२९ मार्च २०१३ च्या अंकात आली आहे.
अधिक माहिती http://www.ftiindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जाहिरात पहा...
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा खात्यात सुरक्षा रक्षकाच्या ९६८ जागांची थेट भरती...
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा खात्यात ९६८ सुरक्षा रक्षकांची पदे भरण्यात येणार असून या थेट भरती साठी दि. १ एप्रिल २०१३ ते २० मे २०१३ या कालावधीत मुलाखती होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाईम्समध्ये दि. १६ मार्च २०१३ रोजी व दै. लोकसत्तामध्ये १५ मार्च २०१३ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
जाहिरात पहा...
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
अभियोग संचालनालयाच्या औरंगाबाद परिक्षेत्र कार्यालयात माजी सैनिकांसाठी २ जागा...
अभियोग संचालनालयाच्या औरंगाबाद परिक्षेत्र कार्यालयात माजी सैनिकांसाठी विशेष भरती मोहिमेअंतर्गत निम्नश्रेणी लघुलेखक (1 जागा), लिपिक टंकलेखक (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवस आहे. यासंबंधी अधिक माहिती https://www.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा आता १८ मे २०१३ रोजी होणार.....
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१३ आयोगाच्या वेळापत्रकानुसार ७ एप्रिल २०१३ रोजी घेण्यात येणार होती परंतु संगणकीय तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सदरील परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. सदरील परीक्षा आता १८ मे २०१३ रोजी घेण्यात असल्याचे आयोगाने जाहीर केले आहे.

दिल्ली पोलीस

दिल्ली पोलीस - DELHI POLICE

Post Box Number 8020, New Delhi-110033

रिक्त पदांचा तपशील :
Sl. No.
Name of post
No. of vacancies
UR
OBC
SC
ST
Total
1
Inspector (Computer)
01
-
-
-
01
2
Sub-Inspector (Computer)
02
-
01
-
03
3
Asstt. Sub-Inspector
(Radio Technician)
21
16
01
03
41
4
Asstt. Sub-Inspector-Shorthand Reporter (Hindi)
02
-
-
-
02
5
Head Constable
(Store Clerk)
09
02
04
02
17
6
Constable
(Bugler)-Male
06
03
-
01
10
7
Constable
(Band Man)-Male
-
10
-
-
10
8
Constable
(Mounted)-Male
-
08
01
02
11
















अंतिम दिनांक : Jun.11.2013            Apply Online
टीप : उमेदवार ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतिने अर्ज भरू शकतो.


Bharat Electronics Ltd.

टीप : Read detail Advertisement then fill application form online